मुंबई -विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या विशेष तपासणीत ओमिक्रोनचे 12 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. हा वेग चिंताजनक असून तातडीने उपाय योजना करणे आणि निर्बंध अधिक कडक करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे. ( Omicron Patients in Vidhan Bhavan )
विधानभवनात आढळले 12 रुग्ण -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कोविड 19ची विशेष तपासणी मोहीम 25 आणि 26 तारखेला राबवण्यात आली. या तपासणी मोहिमेत ३२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. मात्र, त्यापैकी 12 जणांना ऑमायक्रॉनची लागण झाल्याचे आता समोर आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.
हेही वाचा -Omicron Death In Maharashtra : भारतात ओमायक्रॉनचा पहिला बळी; पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह
मुंबईकरांचे ५० टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत उर्वरित रुग्ण पिंपरी-चिंचवड कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई तसेच वसई विरार येथे आढळले आहेत. मुंबईतील 19 रुग्णांपैकी कुलाबा, ताडदेव, गिरगाव, वरळी, वांद्रे येथील रुग्ण अधिक आहेत. यापैकी तीन रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तर 16 रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत. यापैकी 8 रुग्णांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशी माहिती पालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.