मुंबई: एका आरोपीने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वृद्ध महिलेला जर्मनीचा रहिवासी असल्याचे दाखवून सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर तिचा विश्वास जिंकून तिला प्रपोज केले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने महिलेला सांगितले की, त्याने तिला एक पार्सल पाठवले आहे. जे की, विमानतळावर कस्टम विभागाने रोखून ठेवले होते आणि ते सोडवण्यासाठी तिला 3.85 लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले.
महिलेने रक्कम वळती केली : पीडितेने बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले. आठ दिवसांनंतर, आरोपीने तिच्याशी संपर्क साधला आणि दावा केला की, तो लंडनहून प्रवास करत दिल्ली विमानतळावर आला. त्या व्यक्तीने कथितपणे सांगितले की, त्याच्याकडे बरीच रोकड आहे. ज्यामुळे कस्टम्सने त्याला ताब्यात घेतले होते आणि त्याला सोडवण्यासाठी तिला 8.78 लाख रुपये द्यावे लागतील, असे तो म्हणाला. त्यानंतर महिलेने ही रक्कम आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल : यानंतर महिलेला समजले की, तिची फसवणूक झाली आहे आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल फोन, वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, चेकबूक आणि इतर साहित्य जप्त केले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात कलम 420 (फसवणूक) आणि भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
अशीही होते फसवणूक: इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक व सबस्क्राईब केल्यास ऑनलाईन टास्कच्या नावानेही फसवणूक करण्यात येते. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेसह समांतर तपास सुरू केला. तक्रारदार मंदार जाधव (38 वर्षे) हे डोंबिवली पश्चिम भागात राहतात. ते नोकरीच्या शोधात असतानाच, त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल नंबर वरून मॅसेज आला. या मॅसेजमध्ये पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती.
हेही वाचा:
- Agra Crime News : आयएएस बनून आलेल्या बबलीने इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला घातला गंडा, लग्न करुन डबोले घेऊन पळाली
- Fake PMO Official : स्वतःला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी सांगणारा आणखी एक तोतया गुजरात पोलिसांच्या जाळ्यात
- Lady Professor Sextortion: विद्यार्थ्याने पाठवला प्राध्यापिकाचा 'तसला' व्हिडिओ तिच्या पतीला