महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Risk Of Climate Change : मुंबईसह 12 किनारी शहरांना बुडण्याचा धोका

गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज ( Intergovernmental Panel on Climate Change ) (आयपीसीसी) कार्यगटाचा एक अहवाल काही दिवसांपुर्वी जारी करण्यात आला आहे. यात स्पष्ट म्हणले आहे की शतकाच्या अखेरी पर्यंत देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह (Mumbai the financial capital of the country) देशातील 12 किनारी शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका (12 coastal cities, including Mumbai, at risk of drowning) आहे.

By

Published : Apr 8, 2022, 4:32 PM IST

oastal cities at risk of drowning
किनारी शहरांना बुडण्याचा धोका

मुंबई: हवामान बदल हा सध्या सगळ्यांचाच चिंतेचा विषय आहे. आयपीसीसी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश देत आहे. गेला मार्च महिना भारताच्या इतिहासातील सर्वात उष्ण राहिला या महिण्यात 40 डिग्री सेल्सियस तापमान ओलांडले होते. येवढे तापमान येरवी साधारण एप्रिल मे मधे पहायला मिळायचे. भारताच्या पुर्व किनाऱ्यावरील अनेक गावांत समुद्राची पातळी वाढणे, चक्रीवादळे आणि इतर बाबींवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

सागरी किनारपट्ट्यालगतच्या अनेक गावांत पाणी पातळी वाढल्यामुळे स्थलांतरे सुरू झाले आहेत. येत्या काही वर्षात लाखो लोकांना किनारपट्टीपासून स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. कारण 21 व्या शतकाच्या अखेरिस किनारी भाग पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि त्यावेळी निर्माण होणाऱ्या परस्थितीबद्दल आत्ता पासूनच सतर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

समुद्राच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शतकाच्या अखेरीस देशातील किनाऱ्या लगत असलेली 12 शहरे पाण्याखाली जाऊ शकतात असा इशारा हवामान बदल अहवालात देण्यात आला आहे. यात मुंबई कोटी चेन्नई विशाखापट्टणम सारख्या शहरांचा समावेश आहे.

भारताला 7500 किलोमीटरची सर्वात लांब किनारपट्टील आहे. यात सुमारे 485 पेक्षा जास्त शहरांता समावेश आहे. या भागात सुमारे 41.7 दशलक्ष रहिवासी आहेत. वाढणारे तापमान हा पण चिंतेचा विषय आहे. यामुळे क्रयशक्तीवर मोठा परिणाम पहायला मिळत आहे.

हिमनगाच्या वितळण्यामुळे भारतातील 12 शहरे 3 फुटांपर्यंत पाण्यात बुडतील असा धक्कादायक रिपोर्ट अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने जारी केला आहे. अहवालाच्या मते, वर्ष 2100 पर्यंत जगाच्या तापमानात लक्षणीय वाढ होईल. लोकांना भयंकर उष्णता सहन करावी लागेल. वेगाने पारा वाढला तर हिमनद्या वितळतील आणि मोठा विनाश होईल.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे भारतातील मुंबईसह 12 शहरे पाण्यात बुडणार असल्याचा धक्कादायक रिपोर्ट आधिच जारी केलेला आहे. या अहवालानुसार भविष्यात लोकांना उष्णतेचा खूप जास्त सामना करावा लागू शकतो. भारताच्या ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किद्रोपूर किनारपट्टी या शहरांमधील पाणी पातळी येत्या दहा वर्षांमध्ये दोन ते सात इंचांनी, तर येत्या 80 वर्षांमध्ये सुमारे तीन फुटांनी वाढेल.

ही शहरे व्यापाराच्या दृष्टिनं महत्त्वाची आहेत. तसंच या शहरांमधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आयपीसीसीचा इशारा गंभीर समजला जातो आहे. अशा स्थितीत या भागात राहणाऱ्या लोकांना भविष्यात ही जागा सोडावी लागू शकते.अमेरिकी अंतराळ संस्था नासा (NASA) आणि इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजने(IPCC) जारी केलेल्या अहवालानुसार वर्ष 2100 पर्यंत जगाच्या तापमानामध्ये 4.4 डिग्री (World temperature in 2100) सेल्सिअसने वाढ होईल. यामुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवरील बर्फ वितळून जगातील अनेक ठिकाणची जमीन पाण्याखाली जाईल. यामध्ये भारतातील समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या 12 शहरांचा समावेश आहे.

हेही वाचा : Covid Vaccination Booster Dose : १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर डोस'.. आरोग्य मंत्रालयाची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details