मुंबई :दहावीचा निकाल लागला की, अकरावीच्या परिक्षेचे वेध लागतात. आता अकरावीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केलेली आहे. त्यांची पडताळणी झालेली आहे. त्यांच्यासाठी आता 8 जून ते 12 जून या कालावधीमध्ये प्रवेश प्रक्रिया अकरावी ऑनलाइनमध्ये वेळापत्रकानुसार निश्चित केली गेली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पसंतीक्रम नोंदवणे म्हणजे नियमित पहिल्या फेरी एकसाठी पसंती अर्ज भाग 2 ऑनलाईन सादर करणे. किमान एक व कमाल एक असे दहा पसंती क्रम विद्यार्थ्यांना यामध्ये नोंदवता येतील, असे निश्चीत केले आहे.
मुदतीत फॉर्म लॉक करावा :केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना डेटा प्रक्रिया झाल्यानंतर भाग दोनमध्ये त्यांनी दिलेला जो काही पसंती क्रम असेल, त्यानुसार प्रवेशासाठीचे विद्यालय त्यांना दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विहित मुदतीच्या आधी त्यांचा फॉर्म दोन हा लॉक करायला हवा. 8 जून ते 12 जून या काळात नवीन विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करणार असतील तर त्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यावा. तसेच त्या अर्जामध्ये दुरुस्ती देखील करता येईल. परंतु तो अर्ज वेळेत लॉक करणे सक्तीचे असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या अर्ज संबंधित माध्यमिक शाळेमध्ये किंवा शासनाने अधिकृत केलेल्या मार्गदर्शन केंद्रद्वारे प्रमाणित केले जाईल. विद्यार्थ्यांना अंतिम तारखेपूर्वी त्यांचा अर्ज भाग क्रमांक एक हा प्रमाणित करून झाल्यावर भाग क्रमांक दोन भरता येईल. अकरावी ऑनलाइनचा प्रवेश अर्ज भाग एक 12 जून पर्यंत सायंकाळी चार वाजे पर्यंतच भरता येईल. तर मार्गदर्शन केंद्रावरील सर्व अर्ज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रमाणित करण्यात येतील.
13 जूनपासून गुणवत्ता यादी जाहीर :ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक अर्ज भरलेला असेल, तो अर्ज पडताळणी झालेला असेल अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी 13 जूनपासून जाहीर होईल. तसेच गुणवत्ता यादीमध्ये जर काही हरकती असतील, तर त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना हरकती घेता येईल. विद्यार्थ्यांनी 'ग्रीन टूल' या पर्यायात ऑनलाईन वेबसाईटवर हकरती नोंदवू शकता.