महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू - अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या फेरीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे.

varsha
varsha

By

Published : Aug 14, 2021, 5:01 PM IST

मुंबई -विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज (14 ऑगस्ट) करण्यात आले आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

साडेपाच लाख जागा -

बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामिण भागात प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.

अर्ज भरण्यास आजपासून सुरू -

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. पाच क्षेत्रे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. त्याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सविस्तर सूचना निर्गमित करण्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा आजपासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

अशी असणार प्रवेश प्रक्रिया -

पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून (14 ऑगस्ट) होणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिटची उपलब्धता बघता येईल. त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी ५ सप्टेंबरला आणि चौथी फेरी १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

हेही वाचा -निकाल जाहीर करा.. अन्यथा मुंबई विद्यापीठात बाँम्ब स्फोट घडवून आणू, ई-मेलवरून धमकी!

ABOUT THE AUTHOR

...view details