महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

11th Admission: यंदाही 11 वी प्रवेशासाठी उशीर; जून महिन्यात सुरू होणार प्रक्रिया - 11th Admission Process Starts

11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदा देखील अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला उशीर झालेला आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांची यासंदर्भातली नोंदणी 15 मे पासून सुरू होणार आहे.

11th Admission
11 वी प्रवेशासाठी उशीर

By

Published : May 10, 2023, 5:20 PM IST

मुंबई :राज्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच लाखापेक्षा अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश मिळावा म्हणून धडपड करीत आहेत. या शैक्षणिक वर्षामध्ये जून पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. मागील वर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला होता. 2023 या शैक्षणिक वर्षात देखील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरुवात होणार आहे. जून महिन्यात म्हणजे दहावीच्या निकालानंतरच ही प्रक्रिया सुरू होईल.




ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू?: यंदा दहावीचा वार्षिक निकाल अजून घोषित झालेला नाही. परिणामी तो निकाल घोषित झाल्याखेरीज अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे दिसणार नाहीत. ही प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होईल. राज्याचे शिक्षण संचालनालयाने वेळापत्रकामध्ये एक जून 2023 पासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, असे म्हटले आहे.



हेल्पलाइन आणि मदत कक्ष स्थापन: अकरावी प्रवेशनाच्या अनेक फेऱ्या पार पडतात. अनेकवेळा विद्यार्थ्यांना तांत्रिक कारण समजत नाही. यासंदर्भात आता राज्य आणि शिक्षण संचालनालय यांनी 22 मे रोजी हेल्पलाइन सुरू करण्यात सुनिश्चित केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन याद्वारे माहिती आणि मदत केली जाईल. तसेच 15 मे पासून प्रत्यक्ष मदत केंद्र देखील आपण केले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल. अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करावी लागते. ही नोंदणी 15 मे पासून होणार आहे. त्या दिवसापासून कनिष्ठ महाविद्यालयाने त्याबाबत संचलनालयाकडे नोंदणी करायची असते. नोंदणीसाठी कोणते कनिष्ठ महाविद्यालय कोणत्या वर्गवारीमध्ये येतात याची छाननी संचलनालयाला करावी लागते.

हेही वाचा -

  1. Online Admission started ११ वी प्रवेश आजच्या फेरीत ८१७५४ जागा रिक्त प्रवेश फक्त २६७
  2. BMC Doctors Resignation Case मुंबई महापालिकेतील निवासी कनिष्ठ डॉक्टर देणार सामूहिक राजीनामा जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार
  3. SSC Board Exam 2023 उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा यंदा 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांची नोंदणी

ABOUT THE AUTHOR

...view details