मुंबई- मुंबईत शनिवारी कोरोनाचे नवे 1197 रुग्ण आढळून आले असून 136 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65265 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 3559 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 32867 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28839 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी मुंबईत कोरोनाचे 1197 नवे रुग्ण... 136 जणांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नव्याने 1197 रुग्ण आढळून आले आहेत. तर 136 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 75 मृत्यू 16 ते 19 जूनचे तर 61 मृत्यू 16 जून पूर्वीचे आहेत. मृतांपैकी 92 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नव्याने 1197 रुग्ण आढळून आले आहेत. तर 136 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 75 मृत्यू 16 ते 19 जूनचे तर 61 मृत्यू 16 जून पूर्वीचे आहेत. मृतांपैकी 92 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 94 पुरुष आणि 42 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 9 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 76 जणांचे वय 60 वर्षावर तर 51 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईमधून शनिवारी 610 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 32867 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 13 ते 19 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 2.15 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दर वाढीचा दर 34 दिवसांवर पोहोचला आहे.