महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाच्या 1 हजार 179 नव्या रुग्णांची नोंद, 32 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना आकडेवारी बातमी

मुंबईत सोमवारी 1 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर 32 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील 1 लाख 45 हजार 805 वर पोहोचला आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 31, 2020, 9:24 PM IST

मुंबई - महानगरत सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) 1 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 45 हजार 805 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 655 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज (सोमवारी) 917 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 17 हजार 268 वर गेला आहे.

सध्या मुंबईत 20 हजार 554 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 84 दिवसांवर गेला आहे.

विश्वभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे मुंबईत आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 917 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 17 हजार 268 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 45 हजार 805
रुग्ण असून 1 लाख 17 हजार 268 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 655 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 554 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 84 दिवस तर सरासरी दर 0.83 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 567 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 171 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 7 लाख 68 हजार 818 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -ई-पास रद्द, राज्य सरकारचा निर्णय; अनलॉक 4 साठी नवी नियमावली जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details