मुंबई - राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत ११ हजार ३९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ७१७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १४ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १०, भिवंडीत ३ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १४ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्याच्या ४, १२ ते २४ महिन्याच्या ८ तर २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षाच्या २ बालकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६ मुलींचा तर ८ मुलांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानिहाय गोवरचा प्रसार -मुंबईत ४०६२ संशयित रुग्ण असून ३०३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ७८१ संशयित रुग्ण असून ७० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ७९३ संशयित रुग्ण असून ४८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ४८९ संशयित रुग्ण असून ४४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. ठाणे जिल्हा येथे १३० संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई - विरार मनपा येथे १७६ संशयित रुग्ण असून ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १४६ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २३० संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. औरंगाबाद येथे ९६ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे २५६ संशयित रुग्ण असून ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.