मुंबई :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अनेकांचे बळी घेतल्याचे आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या २४ तासात १११५ कोरोना रुग्णांची तर ९ मृत्यूंची नोंद झली आहे. ५६० रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५२ हजार २९१ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७० मृत्यूंची नोंद झाली आहे. ७९ लाख ९८ हजार ४०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ५४२१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १५७७, ठाणे ९५३, पुणे ७७६, नागपूर ५४८, रायगड २३७, पालघर १६०, सांगली १६७, सोलापूर १२५, सातारा १२३, उस्मानाबाद १२४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
'या' विभागात मृत्यूंची नोंद :राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक ते तीन मृत्यूंची नोंद होत होती. बुधवारी त्यात वाढ होऊन ९ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई २, ठाणे पालिका २, वसई विरार पालिका १, पुणे पालिका ३ तसेच अकोला येथे १ असे आज मृत्यू नोंद झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४८ हजार ४७० मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या एक हजारच्या पार गेली आहे. तसेच मृत्यूची संख्या वाढल्याने नागरिकांची आणि आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.