मुंबई : मुलाच्या वडिलांनी आजोबा आणि मामाच्या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले होते की मुलाचा ताबा वडिलांकडे असावा. कारण मी त्याचा वडिल आहे. मामाच्या नातेवाईकांना कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात वडिलांकडे मुलाला सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या मुलाची आई 3 वर्षाआधी वारली आहे.
अनेक प्रयत्न विफल :मुलाचा ताबा देण्याबाबत अनेक प्रयत्न विफल ठरले. या प्रक्रियेत मुलाची हेळसांड झाली. त्याचे संगोपन झाले नाही . फार दयनीय अवस्था त्या बालकाची झाली. ते पाहून न्यायालयाने सर्व तथ्य पाहून 1 फेब्रुवारी 2022 ला त्याच्या वडिलांकडे देण्याचे आदेश काढले होते. मात्र 16 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे देखील पालन झाले नाही. अखेरीस, न्यायालयाने पुन्हा बसून मुलाच्या आईच्या नातेवाईकांची बाजू मांडणाऱ्या वकिलाला फटकारले. त्यानंतर पुन्हा एकदा कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात मुलाचा ताबा वडिलांकडे सोपवण्याचे आदेश मातेच्या नातेवाइकांना दिले होते. आदेशाचे पालन न झाल्याने वडिलांनी न्यायालयाचा अवमान झाला अशी याचिका दाखल केली होती.
आईचे कर्करोगाने निधन :मुलाच्या आईचे तीन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते. त्याचे आजोबा आणि मामा मुलाचा ताबा देण्यास नकार देत होते. मुलाला वडिलांसोबत न जाण्यास शिकवत होते, असा दावा वडिलांनी न्यायमूर्तींसमोर केला होता. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि पीडी नाईक यांच्या खंडपीठाने अवमान याचिकेवर आदेश दिला. त्यात त्यांनी पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलाला उच्च न्यायालयाच्या आवारात वडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले होते. हा आदेश दिल्यानंतर जेव्हा वडिलांनी मुलाला घरी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलाने जाहीर विरोध केला, आरडाओरडा करून वडिलांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. ही बाब मोठी केविलवाणी होती.
मुलाच्या इच्छेनुसार सर्व काही : उच्च न्यायालयाच्या आवाराबाहेर जमलेल्या प्रचंड गर्दीत, वडिलांनी मुलाला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला. आजी-आजोबा आणि वडील यांच्यात भांडण झाले. मुलाने वडिलांच्या तावडीतून सुटका केली आणि पुन्हा उच्च न्यायालयाच्या इमारतीत धाव घेतली. वडिलांचे वकील अॅडव्होकेट आकाश विजय यांनी कोर्टाला विनंती केली की वडिलांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये हवाली होऊ शकते. तेव्हा न्यायालयाने मुलाला प्रेमाने सांगितले तुझ्या वडिलांच्या इच्छेनुसार सर्व काही होईल असे नाही. तू आदेश मान किंवा नको मानू तू स्वतंत्र आहेस तुला जसे आवडते तसे तू राहू शकतो. मोठ्या अवघड स्थितीत न्यायालयाने हा मुद्दा बालकाला सांगण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा :Thane Crime News: शेजाऱ्याच्या 2 मुलांना इमारतीवरून फेकले, एकाचा मृत्यू