मुंबई - डिसेंबरपासून मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट बाधितांची संख्या वाढते आहे. विशेष करून इमारतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता झोपडपट्टयांतही कोरोना पसरतो आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत कंटेनमेंट झोनमुक्त असलेल्या झोपडपट्ट्यां कंटेनमेंट झोन जाहीर करून सील करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत तब्बल ११ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. ( 11 Slums Sealed in Mumbai Over Omicron Variant Mumbai )
झोपडपट्ट्यांमध्ये ११ कंटेनमेंट झोन -
मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा एकदा वेगाने वाढतो आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १००पर्यंत कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आता ही संख्या रोज सहा हजारांवर गेली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येने मुंबईची चिंता वाढवली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या संख्येने वाढणारे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये दोन रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर पाच रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील केले जात आहे. तर झोपडपट्टीमध्ये पाच ते दहा रुग्ण आढळल्यास संबंधित भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ल्यामध्ये ७, ग्रँट रोड-गिरगाव परिसर ३ आणि वरळी विभागात १ असे ११ कंटेनमेंट झोन पालिकेकडून जाहिर करण्यात आला आहे.
‘डी’ वॉर्डमध्ये झोपडपट्टीत पहिला कंटेनमेंट झोन -