मुंबई : अंंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 27 वर्षांच्या आफ्रिकन आरोपीकडून ५६ ग्रॅम 'एम.डी.' (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले होते. या अंमली पदार्थाची किंमत 99 लाख होती. तर 37 वर्षे आरोपीकडून ६० ग्रॅम 'एम.डी.' जप्त करण्यात आले. याची किंमत 92 लाख रुपये आहे. अशाप्रकारे एकूण 1 कोटी 91 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
संशयावरून अटक केली अन् : वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट, मुंबईच्या पथकाने पूर्व प्रादेशिक विभागामध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे पुरवठा, साठा करणाऱ्या इसमांचा 21 जानेवारीला गस्तीदरम्यान शोध घेण्यात आला होता. यावेळी डंपिंग वॉल कंपाउन्ड जवळ, बैंगनवाडी, गोवंडी या ठिकाणी २७ वर्षे वयाच्या एक संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे ५६ ग्रॅम 'एम.डी.' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याच्याविरुद्ध कलम ८ (क) सह २२ (क) एन. डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.