महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Piyush Goyal on Chawls : एमएमआरडीए आणि म्हाडामार्फत मुंबईतील 11 चाळींचा होणार पुनर्विकास - पीयूष गोयल - Piyush Goyal onDilapidated Chawls

नॅशनल टेक्स्टाईल महामंडळाच्या मुंबईतील गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचा पुनर्विकास होणार आहे. यामध्ये तब्बल 11 चाळींचा समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या उच्चस्तरीय समितीने हा नुकताच निर्णय घेतला आहे.

Union Minister Piyush Goyal
केंद्रीय मंत्री पियुष गोयल

By

Published : Jan 16, 2023, 9:46 AM IST

Updated : Jan 16, 2023, 12:41 PM IST

मुंबई : मुंबई आणि राज्यात घरांचे स्वप्न पाहता पाहता कामगारांच्या पहिली दुसरी तिसरी पिढी जन्माला येते. मात्र हजारो कामगारांना अद्यापही आपल्या हक्काचे घर मिळू शकले नाही. मात्र शासनाने मुंबईतील राष्ट्रीय वस्तु उद्योग महामंडळाच्या ज्या नऊ गिरण्यांच्या जमिनी आहेत त्यावर 11 चाळींचा म्हाडाच्या मार्फत पुनर्विकास करण्याचे ठरवलेले आहे. हा पुनर्विकास लवकरच करण्यात येईल.

म्हाडाच्या मार्फत जलद गतीने पुनर्विकास :केंद्रीय वस्तू उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता चाळींचा पुनर्विकास जलद गतीने होईल आणि हा म्हाडामार्फत विकास करत असताना उपकर ज्यांना प्राप्त नाही तसेच उपकर ज्यांना लागू नाही अशा इमारतींना उपकर प्राप्त म्हणून रूपांतरित करण्याची सूचना राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने केली आहे. त्यामुळे आता या 11 चाळींचा म्हाडाच्या मार्फत जलद गतीने पुनर्विकास होऊ शकतो.

घरांच्या विकासाची योजना : केंद्रीय उद्योग मंत्री गोयल यांनी गिरण्यांच्या जमिनीवरील या 11 चाळींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात तातडीने हा प्रश्न निकालात निघण्यासाठी अनेक महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. हा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला देखील काही एक मतांचा लाभ मिळण्यासाठी होऊ शकतो अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. म्हाडाला पुनर्विकासासाठी देण्याचे कारण राष्ट्रीय टेक्स्टाईल महामंडळाला घरे बांधणे पुनर्विकासाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळेच म्हाडा आणि एमएमआरडीए संयुक्त विद्यमाने हे काम करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत तशी चर्चा झालेली आहे. आणि प्रत्यक्षात घरांच्या विकासाची योजना राज्याच्या नगरविकास विभागाला तशी सूचना देखील केलेली आहे आणि म्हणूनच पुनर्विकास संदर्भात उच्चस्तरीय समिती या संदर्भात पुढील महत्त्वाचे निर्णय देखील घेतील असे देखील केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

घरे मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार :मुंबईतील राष्ट्रीय उद्योग महामंडळाच्या ज्या नऊ गिरण्या होत्या त्या ठिकाणी आता 11 चाळींचा म्हाडाच्या आणि एमएमआरडीएच्या वतीने संयुक्त पुनर्विकास केला जाईल. यामध्ये माढा मार्फत सुमारे 1,892 कुटुंबांना घरे मिळण्याचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. तर एनटीसीच्या सीएमडी प्राजक्ता वर्मा यांनी एनटीसी मिलची स्थिती आणि चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले की कापड गिरण्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एनटीसीची स्थापना 1968, 1974, 1985 आणि 1995 च्या राष्ट्रीयीकरण कायद्याद्वारे करण्यात आली होती. सध्या NTC कडे 23 कार्यरत गिरण्या, 49 बंद गिरण्या, 16 जेवी गिरण्या आणि 2 नॉन-ऑपरेशनल गिरण्या आहेत, ज्यात अंदाजे 10000 कर्मचारी आहेत. मुंबईत 13.84 एकर क्षेत्रात NTC मिलच्या 11 चाळी आहेत.

Last Updated : Jan 16, 2023, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details