मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट शनिवारी 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठीची घोषणा आज राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता हे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.
आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट - दहावी ऑनलाईन हॉलटीकीट
काही दिवसांवर दहावीची बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली आहे. त्यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना हॉलतिकीट शाळांच्या लॉगिनमधून डाउनलोड करायचे असून ते संबंधित शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, यासाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास सर्व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधून त्यासाठीची माहिती घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना हे हॉलतिकीट शाळांच्या लॉगिनमधून डाउनलोड करायचे असून ते संबंधित शाळांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, यासाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास सर्व माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधून त्यासाठीची माहिती घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. हे हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत. विशेष म्हणजे हे हॉलतिकीट प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का स्वाक्षरी करावी. यामध्ये काही माध्यम व विषयांचा बदल असेल, तर त्यासाठीच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्या, असेही आज काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे
दहावी आणि बारावीच्या हॉलतिकीट क्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, विषयाचे नाव किंवा परीक्षा केंद्र यांचा कायम घोळ असतो. हाच घोळ कमी करण्यासाठी यावेळी राज्य शिक्षण मंडळाने ही पावले उचलली आहेत. यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटमध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठीची दुरुस्ती करणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास दुसरी प्रतीही सहजपणे मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.