मुंबई - 'एक बंगला बने न्यारा' असे म्हणत सर्वजण बंगल्याचे, रो हाऊसचे स्वप्न पाहतात. पण मुंबई-नवी मुंबईसारख्या महागड्या शहरात बंगला, रो हाऊसचे स्वप्न पूर्ण करणे मात्र सर्वसामान्यांसाठी अत्यंत अवघड. असे असताना नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून मात्र काही जणांना हे स्वप्न प्रत्यक्षात आणता येते. त्यानुसार बंगला, रो हाऊसचे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी सिडकोने पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. सिडको बुधवारी तब्बल 106 निवासी भूखंडाची विक्री करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 12 फेब्रुवारीपासून यासाठी अर्ज करता येईल आणि 3 मार्चला ई-लिलाव होणार आहे. महत्वाचे म्हणजे सिडकोकडून एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने करण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी भूखंड विक्री आहे.
मागील महिन्यात 27 भूखंडाची झाली होती विक्री
सिडकोने नववर्षाच्या तोंडावर 27 निवासी भूखंडाच्या ई-लिलावासाठी जाहिरात काढली होती. तर 14 जानेवारीला या भूखंडाचा ई-लिलाव झाला होता. न्यू पनवेल आणि घणसोलीतील हे भूखंड होते. 65 चौरस मीटरपासून 831 चौरस मीटरपर्यंतचे हे भूखंड होते. तर आता सिडको 106 निवासी भूखंडाचा सर्वात मोठा ई-लिलाव जाहीर केला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इच्छुकांना निवासी भूखंड खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
आजपासून ईएमडीसह अर्ज सादर करता येणार
सिडकोने काल, बुधवारी 106 निवासी भूखंडाच्या ई-लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार काल सकाळी 11 वाजल्यापासून यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. तर शुक्रवारपासून अनामत रक्कमे (ईएमडी) सह अर्ज सादर करता येणार आहेत. तर 2 मार्च ही ईएमडीसह अर्ज सादर करण्यासाठी शेवटची मुदत असणार आहे. 3 मार्चला ई-लिलाव होईल आणि 4 मार्चला ई-लिलावाचा निकाल जाहीर होईल.
असे आहेत भूखंडाचे बेस रेट
न्यू पनवेल, खारघर, ऐरोली, घणसोली आणि नेरुळ येथील हे भूखंड आहेत. नवी पनवेल येथील 28, खारघरमधील 15, नेरुळमधील 11, घणसोलीतील 37 आणि ऐरोलीतील 12 असे एकूण 106 निवासी भूखंड आहेत. 52.21 चौरस मीटर पासून ते 436.45 चौरस मीटर पर्यंतचे हे भूखंड आहेत. तर यासाठी 70 हजार ते 1 लाख चौरस मीटर रुपये असे बेस रेट सिडकोने ठरवले आहेत. तर भूखंडाच्या एकूण अंदाजित रकमेच्या 10 टक्के रक्कम अर्जदारांना अनामत रक्कम म्हणून भरायची आहे.
सिडकोचा बंपर धमाका : 106 निवासी भूखंडाचा ई-लिलाव; न्यू पनवेलसह 'या' ठिकाणी जमीन खरेदीची सुवर्णसंधी - nerul cidco plots news
सिडको बुधवारी तब्बल 106 निवासी भूखंडाची विक्री करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 12 फेब्रुवारीपासून यासाठी अर्ज करता येईल आणि 3 मार्चला ई-लिलाव होणार आहे. महत्वाचे म्हणजे सिडकोकडून एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने करण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी भूखंड विक्री आहे.
सिडकोचा बंपर धमाका : 106 निवासी भूखंडाचा ई-लिलाव; न्यू पनवेलसह 'या' ठिकाणी जमीन खरेदीची सुवर्णसंधी