मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोनाच्या 397 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत 123 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण वाढत असताना कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 397 रुग्णांची नोंद : राज्यात आज (26 मार्च रोजी) 397 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 2117 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 41 हजार 854 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यापैकी 79 लाख 91 हजार 302 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 21 रुग्ण ऑक्सिजनवर : मुंबईत आज 124 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 558 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 56 हजार 384 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 36 हजार 79 रुग्ण बरे झाले असून 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या 4350 पैकी 43 खाटांवर रुग्ण आहेत. 21 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची आरोग्य विभागाने दिली.