मुंबई- कोरोनाचे मुंबईत गेल्या 24 तासात नव्याने 103 रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 433 वर गेला असून आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत 54 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Coronavirus : मुंबईत आज दिवसभरात नवे 103 रुग्ण, तर 20 जणांना डिस्चार्ज - कोरोना विषाणू
कोरोना विषाणूचे मुंबईत गेल्या 24 तासात नव्याने 103 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आज 48 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेल्या 55 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना विषाणूचे मुंबईत गेल्या 24 तासात नव्याने 103 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आज 48 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचणी केलेल्या 55 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत कोरोनामुळे 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 मार्चनंतर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज जाहिर करण्यात आलेल्या एकूण 8 मृतांमध्ये 6 जणांना कोरोनासह इतरही आजार होते. एकूण 8 पैकी 2 रुग्ण 50 ते 55 वर्षांच्या दरम्यानचे तर 6 रुग्ण 60 ते 80 वर्षादरम्यानचे होते. आज मुंबईत नव्याने 103 रुग्ण आढळून आल्याने मुंबईमधील रुग्णांचा आकडा 433 वर पोहचला आहे. तर कोरोनामुळे 8 मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 30 वर पोहचला आहे. गेल्या 24 तासात 20 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.