मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील एमएमआरडीए मैदानात उभारण्यात आलेल्या 1,008 खाटांचे कोविड रुग्णालय अखेर आजपासून सेवेत दाखल झाले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 25 रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांच्यावर उपचार सुरू होतील.
अखेर बीकेसीतील एक हजार खाटांचे 'कोविड रुग्णालय' सुरू..
मुंबईत खाटांची संख्या कमी पडत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने बीकेसीत 1008 खाटांचे रुग्णालय उभारले आहे. गेल्या आठवड्यात हे रुग्णालय मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले.
मुंबईत खाटांची संख्या कमी पडत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने बीकेसीत 1,008 खाटांचे रुग्णालय उभारले आहे. गेल्या आठवड्यात हे रुग्णालय मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष येथे रूग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेच्या हेल्पलाइनवरून ज्या रुग्णांची नावे येत आहेत, त्यानुसार रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे.
अंदाजे 25 रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण करत रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येतील. दरम्यान येथे डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम येथे सज्ज आहे