मुंबई :मध्ये रेल्वे प्रवाशांची गर्दी, सण वार लक्षात घेवून नेहमीच स्पेशल गाड्यांचे आयोजन करत असते. आता उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे. पुणे सावंतवाडी रोड स्पेशल या गाड्यांच्या २० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक 01211 स्पेशल पुणे येथून २ एप्रिल ते ४ जून २०२३ पर्यंत दर रविवारी २१.३० वाजता सुटेल. सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल. तर 01212 स्पेशल ५ एप्रिल ते ७ जून २०२३ पर्यंत दर बुधवारी सावंतवाडी रोड येथून १०.१० वाजता सुटेल. त्याच दिवशी २३.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकावर थांबणार आहे.
पनवेल ते करमाळी :पनवेलकरमाळी स्पेशल गाडीच्या १८ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 01213 स्पेशल पनवेल येथून ३ एप्रिल ते ५ जून २०२३ पर्यंत दर सोमवारी २१.३० वाजता सुटेल आणि करमाळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. 01214 विशेष गाडी करमाळी येथून ४ एप्रिल ते ६ जून २०२३ पर्यंत दर मंगळवारी ०९.२० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि या स्थानकावर थांबेल.
पनवेल सावंतवाडी :पनवेल सावंतवाडी रोड स्पेशल गाडीच्या २० फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 01215 विशेष गाडी पनवेल येथून ४ एप्रिल ते ६ जून २०२३ पर्यंत दर मंगळवारी २१.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल. 01216 स्पेशल दर सोमवारी सावंतवाडी रोड येथून ३ एप्रिल ते ५ जून २०२३ पर्यंत १०.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकावर थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी :लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी या गाडीच्या १८ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 01463 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ६ एप्रिल ते १ जून २०२३ पर्यंत दर गुरुवारी १६.०० वाजता सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी २३.२० वाजता पोहोचेल. 01464 स्पेशल कन्याकुमारी येथून दि. ८ एप्रिल ते ३ जून २०२४ पर्यंत दर शनिवारी १४.१५ वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टावलम, कोट्टाला चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, नागरकोइल जंक्शन या स्थानकावर थांबेल.
पुणे ते अजनी :पुणे जंक्शन ते अजनी स्पेशल गाडीच्या २२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 01189 स्पेशल पुणे जंक्शन येथून ५ एप्रिल ते १४ जून २०२३ पर्यंत दर बुधवारी १५.१५ वाजता सुटेल. अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. 01190 स्पेशल अजनी येथून ६ एप्रिल ते १५ जून २०२३ पर्यंत दर गुरुवारी १९.५० वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकावर थांबेल.
३१ मार्च पासून बुकिंग :या सर्व विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग ३१ मार्च पासून सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. गाड्या थांबण्याच्या वेळेच्या तपशीलांसाठी, enquiry.indianrail.gov.in ला वेबसाईटला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांना रेल्वेकडून सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. होळीच्या दरम्यानदेखील अशा विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 90 विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी मध्य रेल्वकडून ८४ आणि पूर्व मध्य रेल्वकडून ६ गाड्या चालवल्या गेल्या होत्या.
हेही वाचा : Central Railway Revenue: ऐका हो ऐका, मध्य रेल्वेला आले 'अच्छे दिन'; रेल्वेचा महसूल वाढला