मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Anil Deshmukh approached the High Court for bail ) धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांचा विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ( Anil Deshmukh bail plea rejected by CBI court ) उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव. अनिल देशमुख यांच्या अर्जावर 9 नोव्हेंबर पर्यंत सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. उच्च न्यायालयाच्या सुट्टी कालीन एकल खंडपीठाच्या न्यायाधीश शर्मिला देशमुख यांचे सीबीआयला निर्देश. अनिल देशमुख यांच्यावतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कथित भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यासोबतच देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. विशेष म्हणजे, ईडीने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतरच देशमुख यांनी नव्याने जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, विशेष न्यायालयाने देशमुख यांना जामीन देण्यास नकार दिला. अनिल देशमुख हे महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये मंत्री होते. त्याला ईडीने २ नोव्हेंबर २०२१ रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे.