मुंबई- शहर आणि जिल्ह्यात १० मतदान केंद्र महिला शक्तीच्या हाती सोपविण्यात येणार असून तेथील संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. सोमवारी २९ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे १० सखी मतदान केंद्र तयार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी स्विप (SVEEP) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे व्यवस्थापन तसेच नियोजन असलेले एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. सखी मतदान केंद्रावर १ केंद्रप्रमुख, ३ किंवा ४ निवडणूक कर्मचारी, १ पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश असणार आहे.
मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघ असून 2 विधानसभा मतदार संघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतात. या १० आणि उपनगरमधील २ अशा १२ सखी मतदान केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे -
१८२ - वरळी- मतदान केंद्राचे नाव - बी.एम.सी., वरळी सी फेस समुह शाळा, अब्दुल गफार खान मार्ग, मुंबई-३०
१८३ - शिवडी- बी.एम.सी. प्राथमिक मराठी शाळा, तळमजला, मुंबई - ११
१८४ - भायखळा- सर अली कादुरी शाळा आणि महाविद्यालय, तळमजला, शिवदास चापशी मार्ग, माझगाव, मुंबई - १०
१८५ -मलबार हिल - भारत एज्युकेशन सोसायटी, संत गाडगे महाराज वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तळमजला, खोली क्र.1, (उत्तर दिशा)
१८६ - मुबांदेवी- गिल्डर लेन, बी.एम.सी, शाळा, तळमजला, खोली क्र.२, मुंबई सेंट्रल, मुंबई-०८