मुंबई - कोरोनाचे मुंबईत शुक्रवारी (दि. 10 जुलै) नवे 1 हजार 354 रुग्ण आढळून आले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजार 149 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 5 हजार 202 वर पोहचला आहे. मुंबईमधून शुक्रवारी 2 हजार 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शुक्रवारपर्यंत 61 हजार 934 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 738 सक्रिय (अॅक्टीव) रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे मुंबईत शुक्रवारी 73 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 मृत्यांपैकी 58 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 53 पुरुष आणि 20 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 55 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक तर 16 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर