मुंबई - केईएम रुग्णालयातील ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना उपचार देणाऱ्या आरोग्य सेवकांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.
केईएममधल्या नर्सला कोरोनाची बाधा; तिच्या सहवासात आलेल्या 20 जणांची चाचणी - kem nurse corona patient latest news
केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका आयाला आणि एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सच्या सहवासात असलेल्या 20 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट उद्यापर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका आयाला आणि एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता ऑर्थोपेडिक ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सच्या सहवासात असलेल्या 20 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट उद्यापर्यंत येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या नर्सला सेव्हन हिलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर इतर 20 नर्सना होम क्वारेंटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये अद्याप सैफी, साई, जसलोक, सायन, भाटिया आदी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी बहुतेक रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा -या काळातही लहान मुलांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रयत्न करा - जागतिक आरोग्य संघटना