मुंबई - आयएमसी इंडियाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपये देण्यात आले आहे. संस्थेच्या अध्यक्ष आशिष वेद यांनी हा ५० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केला. यावेळी त्यांच्याबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष राजू पोदार, महासंचालक अजित मंगरुळकर, उपसंचालक संजय मेहता आदी उपस्थित होते.
'आयएमसी इंडिया'कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख - आयएमसी इंडियाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपये
आयएमसी इंडियाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपये देण्यात आले आहे. संस्खेच्या अध्यक्ष आशिष वेद यांनी हा ५० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केला.
1 lakh for Chief Minister's Assistance Fund from IMC India
राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.