मुंबई : घाटकोपर ( Ghatkopar Fire ) स्टेशन जवळ परख हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला काल दुपारी आग ( fire at a meter box in Ghatkopar ) लागली होती. या आगीमध्ये एकूण १४ जण जखमी झाले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर असून एकाला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
आगीत १४ जखमी : घाटकोपर येथील परख हॉस्पिटलला लागून असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला काल दुपारी दोनच्या सुमारास आग ( meter box fire in Ghatkopar ) लागली. आगीमुळे परिसरात धूर पसरल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे परख हॉस्पिटलमधील २२ रुग्णांना इतर रुग्णालयात सुखरूप हलवण्यात आले. या आगीत एकूण १४ जण जखमी झाले. त्यापैकी कुरेशी देढीया या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १३ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तुकाराम घाग, शेर परिहार यांनी स्वताहून डिस्चार्ज घेतला आहे. तर कुलसुम शेख, सना खान, हितेश करानी, के. पी. सुनार, अनिल मडगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.