मुंबई -राज्यात आज बुधवारी 767 नव्या कोरोना रुग्णांची (New Corona Cases) नोंद झाली आहे. आज 28 रुग्णांचा कोरोनाने (Corona Patients Death) मृत्यू झाला आहे. तर 903 रुग्णांना डिस्चार्ज (Corona Discharged Patients) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे.
आज राज्यात 767 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 36 हजार 425 वर पोहचला आहे. तर आज 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 25 वर पोहचला आहे. आज 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 84 हजार 338 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 56 लाख 19 हजार 951 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.11 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 74 हजार 812 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 7 हजार 391 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 112
ठाणे - 32
ठाणे पालिका - 38
नवी मुंबई पालिका - 44
नाशिक - 36
नाशिक पालिका - 34
अहमदनगर - 31
पुणे - 71
पुणे पालिका - 101
पिंपरी चिंचवड पालिका - 39
औरंगाबाद - 36
- या दिवशी दिवशी कमी रुग्णांची नोंद -
25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, 30 नोव्हेंबरला 678, 1 डिसेंबरला 767 असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.