Foreign Currency Seized Mumbai : मुंबई विमानतळावर तीन महिलांकडून 1 कोटी 29 लाखांचे परकीय चलन जप्त - foreign currency seized from three women at Mumbai airport
मुंबई (Mumbai airport) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 व वर गुरुवारी मध्य रात्री तीन महिलांकडून 1 कोटी 29 लाख रुपयांचे परकीय चलन (foreign currency seized) जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही महिला शारजाहला जाणार होत्या त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलांची तपासणी केल्यावर कपड्यांमध्ये, बॅगेत चलन आढळून आले. तिन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई:कॉन्स्टेबल सुशीला यांनी या महिलांकडील हँडबॅगची तपासणी केली असता त्यात आणखी काही अमेरिकन डॉलर्स लपवले होते. महिलांच्या ताब्यातून एकूण 1,72,200 यूएस डॉलर्स व 9,700 दिरहम असे 1,29,24,720 रुपये किमतीचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांत लपवलेले अमेरिकन डॉलर्स आणि यूएई दिरहम सापडले. खवला एल्हादी अहमद आमरा, रागा नाउथ मोहम्मद तौम आणि रफिया एलहुसेन अब्दुल्ला अहमद अशी त्यांची नावे असून या महिला सुदानच्या नागरिक आहेत. त्या एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक जी 9-406 ने शारजाहला जाणार होत्या. या प्रकरणाची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.