लातूर - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा ताफा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचला. यावेळी त्यांनी स्वतः चाढ्यावर मूठ धरत शेतकऱ्यांना पेरणी करू लागली. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आदित्य ठाकरेंनी धरली चाढ्यावर मूठ; लातुरातील शेतकऱ्यांशी साधला संवाद - उदगीर लातूर
आदित्य ठाकरे यांनी लातूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते नांदेडकडे मार्गस्थ होत असताना शेतावर थांबले. त्यावेळी त्यांनी चाकूरसह उदगीर तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
आदित्य यांनी लातूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते नांदेडकडे मार्गस्थ होत असताना शेतावर थांबले. चाकूरसह उदगीर तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेले सुनील बिराजदार यांच्याबरोबर पिकांची मशागत केली. तसेच पावसाने हुलकावणी दिल्याने काय अडचणी निर्माण झाल्या? पिकांची स्थिती, पाण्याचे नियोजन या सर्व विषयावर चर्चा केली.
आदित्य यांना शिवारात बघताच आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. या सर्व शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तसेच, उशिरा का होईना मराठवाड्यात पावसाची कृपादृष्टी होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.