महाराष्ट्र

maharashtra

विहिरीत पडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी प्राणिमित्रांनी लावली जीवाची बाजी

शनिवारी दुपारी पाण्याच्या शोधात असलेले हरणाचे पाडस थेट शहरातील समता नगर परिसरात दाखल झाले. 50 फूट खोली असलेल्या विहिरीत त्याला पाणी दिसले मात्र, पाणी पिण्याच्या प्रयत्नात असलेले पाडस थेट विहिरीत पडले. मात्र तरुणांनी समयसूचकता दाखवत त्याला जीवदान दिले.

By

Published : Jun 7, 2020, 5:16 AM IST

Published : Jun 7, 2020, 5:16 AM IST

Updated : Jun 7, 2020, 5:45 AM IST

latur
पाडसाला बाहेर काढताना तरुण

लातूर- पाण्याच्या शोधात असलेले हरणाचे पाडस 50 फूट विहिरीत पडल्याची घटना शिरूर अनंतपाळ शहरातील समता नगर परिसरात घडली होती. समयसूचकता दाखवत प्राणिमित्रांनी या पाडसाचे प्राण वाचवले आहेत. शिवाय त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.

विहिरीत पडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी प्राणिमित्रांनी लावली जीवाची बाजी

पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवीवस्तीमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी दुपारी पाण्याच्या शोधात असलेले हरणाचे पाडस थेट शहरातील समता नगर परिसरात दाखल झाले. 50 फूट खोली असलेल्या विहिरीत त्याला पाणी दिसले मात्र, पाणी पिण्याच्या प्रयत्नात असलेले पाडस थेट विहिरीत पडले. शेतकरी विठ्ठल बळते यांनी माहिती प्राणिमित्र विशाल गायकवाड यांना दिली. त्यांनी तात्काळ दखल घेत काही तरुणांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढले. उन्हाळ्याच्या अंतिम टप्यात या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. हरणाच्या पाडसाला जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे. यामध्ये विशाल गायकवाड यांना बुद्धसागर कांबळे, धनंजय जाधव, साईनाथ गायकवाड यांनी मदत केली. तरुणांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

Last Updated : Jun 7, 2020, 5:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details