लातूर- शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोरक्षण विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. खासगी सावकार आणि अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय - murder
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोरक्षण विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. खासगी सावकार आणि अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
भावडा सिंग जुंनी (वय 35 वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ३० मेपासून गायब होता. तीन दिवसांनंतर आज शहरातील अशोका हॉटेल जवळच असलेल्या गोरक्षण विहिरीत त्यांचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. भावडा सिंग हा सावकारकी करीत होता. यामुळे अनेकांसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार होते. शिवाय खुनासारख्या गुह्यातही त्याचे नाव होते. यातूनच त्याचा खून झाल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. शिवाजी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शवविच्छेदनानंतरच नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.