लातूर -कारागृहातून सुटलेल्या मित्रांचा टिकटॉक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे गंगापूर येथील तरुणांना चांगलेच महागात पडले. या व्हिडिओत तरुणांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांना चोप देत पुन्हा तुरुंगात टाकले आहे. लातूर जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
'टिकटॉक'वरची हिरोगिरी घेऊन गेली पोलिसांच्या दारी! - लातूर पोलीस लेटेस्ट न्यूज
गंगापूर येथील पोलीस पाटीलांना काही दिवसापूर्वी मारहाण झाली होती. या मारहाण प्रकरणी काही तरुणांवर कारवाई झाली. न्यायालयाने दहा दिवस या तरुणांची रवानगी कारागृहात केली. आरोपी तरुणांची सुटका झाल्यानंतर सर्वांनी मिळून पोलिसांची खिल्ली उडवणारा एक टिकटॉक व्हिडिओ तयार केला.
गंगापूर येथील पोलीस पाटीलांना काही दिवसापूर्वी मारहाण झाली होती. या मारहाण प्रकरणी काही तरुणांवर कारवाई झाली. न्यायालयाने दहा दिवस या तरुणांची रवानगी कारागृहात केली. दहा दिवसांची शिक्षा भोगून हे तरुण कारागृहातून सुटणार होते. त्याच दिवशी त्यांना घेऊन जाण्यासाठी काही मित्रांनी कारागृहात आणि पोलीस ठाण्यात गर्दी केली. आरोपी तरुणांची सुटका झाल्यानंतर सर्वांनी मिळून एक टिकटॉक व्हिडिओ तयार केला.
'लातूरच्या पोरांना अन् अवैध धंद्यांना कोण अडवू शकत नाही' अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, गंगापूर पोलिसांच्या हाती त्यांचीच खिल्ली उडवणारा हा व्हिडिओ लागला. पोलिसांनी पुन्हा या तरुणांची रवानगी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. पोलिसांची खिल्ली उडवली की, पोलीस किती मारतात याचा टिकटॉक व्हिडिओ तयार करण्याची वेळ या तरुणांवर आली आहे. त्यामुळे नाद करा पण पोलिसांचा कुठं, अशी जोरदार चर्चा लातूरात सुरू आहे.