महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात चणा डाळ मिलमध्ये कामगाराची आत्महत्या - latur crime

शिंदे एमआयडीसी येथील पंडीलवार इंडस्ट्रीज या चणा डाळ मिलमध्ये काम करत होते. गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी मिलमधील ५० फूट उंच इलेमीटरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मारोती शिंदे

By

Published : Mar 23, 2019, 2:36 AM IST

लातूर - शहरातील एमआयडीसी परिसरातील एका चणा डाळ मिलमध्ये कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कामगाराची आत्महत्या


मारोती माधवराव शिंदे (३७) असे मृताचे नाव असून ते मूळचे चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते लातुरातील महादेव नगरात कुटुंबासह राहत होते. शिंदे एमआयडीसी येथील पंडीलवार इंडस्ट्रीज या चणा डाळ मीलमध्ये काम करत होते. गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी मिलमधील ५० फूट उंच इलेमीटरला गळफास घेऊन आत्महत्या केली.


आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मानसिक तणावात त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हनुमंत माधवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details