लातूर - सासरच्या जाचाला कंटाळून एक महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उर्मिला विशाल म्हस्के (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. शहराजवळील हरंगूळ रेल्वे स्थानकावर या महिलेने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
सासरच्या छळाला कंटाळून महिलेची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या - women suicide due to harassment by in law
उर्मिला यांचा काही वर्षांपूर्वी आलमाला येथील विशाल मस्के यांच्याशी विवाह झाला होता. कामानिमित्ताने त्या शहराजवळील वसवाडी येथे नवऱ्यासोबत राहत होत्या.
उर्मिला यांचा काही वर्षांपूर्वी आलमाला येथील विशाल मस्के यांच्याशी विवाह झाला होता. कामानिमित्ताने त्या शहराजवळील वसवाडी येथे पतीसोबत राहत होत्या. त्यांचे पती विशाल हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. असे असतानाही सासू आणि नणंदच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हरंगूळ स्टेशनवर मिरज-निजमाबाद या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उर्मिला यांचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पश्चात 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. तर अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार