महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : टिप्परची दुचाकीला धडक ; माय- लेकाचा जागीच मृत्यू

कुंभारी येथील शिंदाळे दाम्पत्य मुलांना घेऊन लातूरला येत असताना ही दुर्घटना शनिवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली. रेणापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधीक तपास करत आहेत.

लातूर अपघात

By

Published : Sep 14, 2019, 4:16 PM IST

लातूर -रेणापूर-लातूर मार्गावरील महापूर गावलगत टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. कुंभारी येथील शिंदाळे दाम्पत्य मुलांना घेऊन लातूरला येत असताना ही दुर्घटना शनिवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली.

तुकाराम शिंदाळे हे रुग्णालयात असलेल्या नातेवाईकाला पाहण्यासाठी पत्नी यशोदा आणि दोन मुलांना घेऊन लातूरला निघाले होते. दरम्यान, महापूर येथील मांजरा नदीच्या पुलावर पाठमागून टिप्परने ( एम.एच. 24 ए.यु. 1830) जोराची धडक दिली. यामध्ये यशोदा शिंदाळे (वय 25) व त्यांचा दीड वर्षाचा मुलगा प्रतीक यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी आईच्या कुशीतच प्रतीक हा मृतावस्थेत होता. तर तुकाराम व त्यांचा दुसरा मुलगा प्रशांत हे यामध्ये जखमी झाले आहेत.

हेही वाचा - लातूर बंद : निवडणुकांच्या तोंडावर मनपाच्या कारभाराबाबत व्यापारी वर्ग नाराज

गणेश विसर्जनादिवशी तुकाराम यांचा पुतण्या मिरवणुकीदरम्यान जखमी झाला होता. त्याच्यावर लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला पाहण्यासाठी तुकाराम हे पत्नी आणि मुलांना घेऊन निघाले होते. मात्र, शहर 8 किमी अंतरावर असतानाच ही दुर्घटना घडली. जिल्हा रुग्णालयात एकीकडे माय-लेकाचे शवविच्छेदन तर दुसरीकडे बाप- लेकावर उपचार अशी स्थिती होती. रेणापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधीक तपास करीत आहेत.

हेही वाचा -...अन्यथा राजकारण सोडून घरी बसेन ; संभाजी पाटलांचा प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगीच निर्धार

ABOUT THE AUTHOR

...view details