महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म, पालकांसमोर पालनपोषणाचा बिकट प्रश्न - Health News

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील गायत्री सोपान बोयणे येथिल महिलेने शहरातील एक खासगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. आठव्या महिण्यातच या मातेची गुंतागुतीची वैद्यकीय प्रसुती करण्यात आली.

निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्याला जन्म

By

Published : Nov 18, 2019, 5:38 PM IST

लातूर -जिल्ह्यातील निलंगा येथील गायत्री सोपान बोयणे येथील महिलेने शहरातील एका खासगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. तिळ्यासह मातेची तब्येत ठीक आहे. आठव्या मिहिन्यातच या मातेची गुंतागुंतीची वैद्यकीय प्रसुती करावी लागली. या महिलेने यापूर्वी जुळ्यांना जन्म दिला होता. यावेळी तिला दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्ये झाली आहेत. तिन्ही बाळाचे वजन वैद्यकीय मापकानुसार कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्याला जन्म

डॉ. एम.एन कुंडुंबले यांनी या महिलेची प्रसुती नैसर्गिक होण्यासाठी प्रयत्न केले. १७ नोहेबरला दुपारी १२.४३ च्या सुमारास पहिले अपत्य जन्मले नंतर दुसरी दोन अपत्ये पोटात असल्याचे निदान झाले. यानंतर त्यांची प्रसुती २० मिनिटांच्या अंतराने झाली. सध्या तिन्ही बाळांना बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे. मात्र, या महिलेच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे, त्यामुळे त्यांना अर्थिक मदतीची गरज आहे. या महिलेचे पती अत्यंत गरीब असल्याने ते त्यांची काळजी घेऊ शकत नाहीत, असे डॉक्टर कुंडुंबले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात यापूर्वी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनाही तिळे झालेले आहे. तशीच घटना निलंगा येथे घडली आहे. या विषयी सर्वत्र चर्चा चालू आहे. दोन वेळाच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व रोजगारासाठी भटकणाऱ्या आई-वडिलांच्या पोटाला तिळे झाल्याने, त्यांचे पालनपोषण कसे करावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details