लातूर - आतापर्यंत लातूर येथील खासगी रुग्णालयातील गैरप्रकार समोर आले होते. मात्र, रविवारी शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे. यासंदर्भात चौकशीसाठी एक समिती नेमली असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डोईबोले यांनी सांगितले आहे.
धक्कादायक : कोविड सेंटरमध्ये महिलेला मारहाण; चौकशीसाठी नेमली समिती - corona positiva woman beaten in latur
लातूर येथील सुपर स्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलमध्ये 62 वर्षीय कोरोना बाधित महिलेवर उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे सदरील महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. पहाटे 2 च्या सुमारास तिने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. मात्र, उपचारांऐवजी या कर्मचाऱ्यांनी तोंडावर मारहाण केल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे.
लातूर येथील सुपर स्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलमध्ये 62 वर्षीय कोरोना बाधित महिलेवर उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे सदरील महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. पहाटे 2 च्या सुमारास तिने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. मात्र, उपचारांऐवजी या कर्मचाऱ्यांनी तोंडावर मारहाण केल्याचा आरोप महिलेच्या मुलाने केला आहे. या प्रकरणाची माहिती महिलेने मुलाला फोनवरून सांगितली. त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. शिवाय तीन दिवस उपचार घेऊनही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी या महिलेला सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या या वर्तणुकीमुळे महिलेला मानसिक धक्का बसला आहे.
महिलेच्या मुलाने झालेला प्रकार पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना कळविला आहे. तसेच, आईचे काही बरेवाईट झाल्यास यास शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार राहील, असाही उल्लेख त्यांनी केला काहे. या सर्व प्रकरणाची करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या मुलाने केली आहे. त्यानुसार, चौकशीसाठी समिती नेमली असल्याचे डॉ. डोईबोले यांनी सांगितले आहे. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील गैरप्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पण आता शासकीय रुग्णालयातही असे प्रकार होऊ लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांत घबराटीचे वातावरण आहे.