लातूर - पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनैतिक संबधाला अडसर ठरत असल्यामुळे पतीने आपल्या पत्नीची हत्या करुन झाडाला लटकविले असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. ही घटना लांबोटा तांडा (ता. निलंगा) येथे घडली.
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; नातेवाईकांचा हत्येचा आरोप हेही वाचा - बँकेला ३० कोटींचा चुना लावणाऱ्या जगदीश वाघचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रयागबाई राम राठोड (वय-40) असे मृत महिलेचे नाव असून लांबोटा तांडा येथील रहिवासी होत्या. त्यांनी वन विभागातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या अनैतीक संबंधामुळे पत्नी चार महिने माहेरी राहायला गेली होती. त्या पुन्हा सासरी आल्यानंतर पतीने परत छळायला सुरुवात केली. अशी माहिती आत्महत्या केलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे.
पोलिसांनी मृतदेह निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठविले आहे. संशयित आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एच. एम. पठाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शेंदुर्णीत मटक्यासाठी परवानगी मागणाऱ्या माथेफिरुने जाळली पोलीस चौकी