लातूर -जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारकडून पुन्हा लॉकडाऊनचे संकेतही दिले जात आहेत. मात्र, परिस्थिती गंभीर असतानादेखील राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शहरातील विविध कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही.
नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यमंत्री संजय बनसोडे हे दाखल झाले असता हजारोच्या संख्येने कार्यकर्ते शिवाय प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कोणत्याही नियमांची अंमलबजावणी की गर्दी टाळण्यासाठी ना कोणता बंदोबस्त नाही. शिवाय राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागणही होऊन गेली आहे. यानंतर काही दिवस कोरोनाबाबत त्यांनी काही दिवस जनजागृतीही केली. मात्र, अवघ्या काही दिवसातच त्यांना याचा विसर पडला असून नियमांच्या अंमलबजावणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विरोधकांनी आता कारवाईची मागणी केली आहे. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी तसेच हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यासह इतर कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली आहे.
कोरोनाची लागण होऊनही दुर्लक्ष
राज्यमंत्री यांना मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सचे महत्त्व पटवून सांगितले. मात्र, आज उदगीर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना याचा विसर पडला.