महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनाधार उदगीरकरांचा; बंडखोरीचा विषय चर्चेला, विकासाचा मुद्दा राहिला बाजूला

जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व असतानाही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे सध्या बंडखोरीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये विकासाचा मुद्दा गायब असल्याची भावना जनता व्यक्त करीत आहे.

उदगीरकरांबरोबर 'ईटीव्ही भारत'ने साधला संवाद

By

Published : Oct 7, 2019, 10:19 AM IST

लातूर - जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व असतानाही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे सध्या बंडखोरीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये विकासाचा मुद्दा गायब असल्याची भावना जनता व्यक्त करीत आहे. शिवाय उदगीरच्या जनतेमध्ये परजिल्ह्यातील उमेदवाराबाबत नाराजीचा सूर असल्याचे पाहवयास मिळत आहे. त्याअनुषंगाने 'जनाधार उदगीरकरां'चा यातून मतदारांचे काय प्रश्न आहेत 'ईटीव्ही भारत'ने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

उदगीरकरांबरोबर 'ईटीव्ही भारत'ने साधला संवाद

उदगीर मतदारसंघात उदगीर आणि जळकोट तालुक्याचा समावेश होतो. या मतदारसंघातून आमदार सुधाकर भालेराव यांच्या विजयाने भाजप पक्षाचे अस्तित्व उदयास आले. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जनतेला पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्याअनुषंगाने कामाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही अहमदपूर तालुक्यातील उजनी येथील पाणी नागरिकांना मिळालेले नाही. शहरातील अंतर्गत रस्ते झाले असले तरी गटारी, पथदिवे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत.

हेही वाचा - 'माझं काय चुकलं'... उदगीरचे भाजप आमदार बंडाच्या पवित्र्यात

सध्या निवडणुकीच्या आखाड्यात असलेले उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर नाही तर पक्षाने केलेला न्याय-अन्याय यावरच बोलत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांना डावलून डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये स्थानिक नेतृत्वाबाबद्दल भावना असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - लातूर : ३२ उमेदवारांचे अर्ज अवैध ; १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

उदगीर हा जिल्हा घोषित करावा, ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. मात्र, हे मुद्दे सध्याच्या प्रचारातून गायब असून उमेदवार एकमेकांचे उनेधूने काढण्यात व्यग्र आहेत. तर, या भागातील रखडलेल्या विकासकामांमुळे जनता चिंतेत आहे. त्यामुळे या मतदारसंघात अगोदर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आणि मग जनतेचे असे चित्र आहे. या मतदारसंघात भाजपकडून डॉ. अनिल कांबळे, अपक्ष सुधाकर भालेराव तर राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे हे नशीब आजमावणार आहेत.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा अवलिया विधानसभा मैदानात

ABOUT THE AUTHOR

...view details