महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरातील धनेगाव धरण कोरडेच, नागरिकांसमोर पाणीसंकट

सरकारने निलंगा मतदार संघातील देवणी तालुक्यात सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे शासनाने शेकडो रुपये खर्च करून धनेगाव येथील मांजरा नदीवर धरण बांधले. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून या भागात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे धरणात एक थेंब देखील पाणी साठले नाही.

लातुरातील धनेगाव धरण कोरडेच

By

Published : Oct 18, 2019, 12:28 PM IST

लातूर -पावसाळा संपल्यानंतर देखील देवणी तालुक्यातील धनेगाव धरणात एक थेंबही पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांसमोर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागणार आहे.

लातुरातील धनेगाव धरण कोरडेच, नागरिकांसमोर पाणीसंकट

सरकारने निलंगा मतदार संघातील देवणी तालुक्यात सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे सरकारने शेकडो रुपये खर्च करून धनेगाव येथील मांजरा नदीवर धरण बांधले. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून या भागात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे धरणात एक थेंब देखील पाणी साठले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

हे वाचलं का? - जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; एअर लिकेजच्या पाण्यावर भागवतायेत तहान

धनेगाव धरण हे आजूबाजूच्या १० ते १५ गावाची तहान भागवणारे आहे. मात्र, पावसाळा संपत आला तरी अद्याप या धरणात थेंबभर पाणी नाही. त्यामुळे विकत पाणी घेऊन जनावरांची तहान भागवावी लागत आहे. येणाऱ्या काळात हीच समस्या कायम राहिली, तर लोकांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. सध्या निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील अनेक गावात टँकर पाणीपुरवठा सुरू आहे. आता परतीचा पाऊस नाही झाला, तर टँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारला ठोस निर्णय घ्यावे लागतील. सध्या पिके चांगली आहेत. मात्र, भविष्यकाळात धनेगाव गावासह परिसरातील १० ते १५ गावाला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details