महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नुतन महापौरांचा अभिनव उपक्रम; जलसंवर्धनासाठी केली जनजागृती

लातूर महामगरपालिकेचे नुतन महापौर विक्रांत गोजमगुंडे, यांनी शहरातील पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.

By

Published : Nov 25, 2019, 8:25 AM IST

लातूर शहरात वॉटर म‌ॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लातूर -शहरातील जनतेचा पाणी प्रश्न सोडिवणे, हाच ध्यास घेऊन महापौरपदी विराजमान झालेले विक्रांत गोजमगुंडे यानी आता त्यासाठी कामकाज करायला सुरूवात केली आहे. यासाठी त्यांनी पहिला उपक्रम राबविला आहे, आणि तो आहे जलसंवर्धनासाठी जनजागृती करणे. लातूर शहरकरांना पाणी बचतीचा मुलमंत्र देण्यासाठी, रविवारी शहरात वॉटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला होता.

लातूर शहरात वॉटर म‌ॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...

हेही वाचा... शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे

लातूर आणि पाणीप्रश्न हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती अन् यंदाही भर पावसाळ्यात लातूरकरांना १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली होती. सध्या परतीच्या पावसाने लातूरकरांचा पाणीप्रश्न मिटला असला, तरी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. हाच उद्देश घेऊन लातूर महानगरपालिकेच्या वतीने वॉटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा... ...म्हणून या अधिकाऱ्याने कार्यालयात लावला 'मी प्रामाणिक आहे' असा फलक

या म‌ॅरेथॉन वेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एम.डी. सिंह, उपमहापौर चंद्रकांत बिरजदार यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. 'गेल्या अडीच वर्षात महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. या दरम्यान, पाणीप्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, म्हणूनच सत्तांतर झाले आहे. त्यामुळे पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार', असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा... मी राष्ट्रवादीतच व शरद पवारच आमचे नेते; भाजप-राष्ट्रवादी सरकार पाच वर्षे चालेल- अजित पवार

त्यामुळेच महापौर पदावर विराजमान होताच, पाणी बचतीच्या अनुशंगाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील नाना-नानी पार्कपासून ते जिल्हा क्रिडा संकुलपर्यंत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लातूर वासीयांसाठी जनजागृतीच्या अनुशंगाने हे पहिले पाऊल उचलण्यात आले असले, तरी पाणी प्रश्न मिटवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, हे देखील तितके आवश्यक आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details