महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरकरांसाठी खुशखबर; मांजरा धरणाची पाणीपातळी वाढल्याने पाणीप्रश्न मिटला - लातूर पाणीप्रश्न

मांजरा धरणात आता 132 दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून एमआयडीसीमध्येही सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

मांजरा
मांजरा

By

Published : Sep 30, 2020, 1:07 PM IST

Updated : Sep 30, 2020, 1:42 PM IST

लातूर - दोन महिन्यांपूर्वी मृत साठ्यात असलेल्या मांजरा धरणात आता 132 दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता तर मिटली आहेच, शिवाय एमआयडीसीमध्येही सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

मांजरा धरणाची पाणीपातळी वाढल्याने पाणीप्रश्न मिटला

लातूर शहरासह येथील एमआयडीसीला देखील मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने 46 दलघमी पेक्षा कमी साठा होता. यंदा मात्र, समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात 124 दलघमी पाणी धरणात जमा झाले आहे. तर आतापर्यंत एकूण साठा हा 132 दलघमी झाला आहे. 224 दलघमी क्षमता असलेले हे धरण 60 टक्के भरले आहे.

लातूर शहराला आता सात दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. तर, मांजरा नदीतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने लगतच्या शेतजमिनीलाही याचा फायदा होणार आहे. मांजरा धरण हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असले तरी लातूरचा पाणीपुरवठा आणि मांजरा पट्टा म्हणून ओळखली जाणारी उसाची शेती याच धरणावर अवलंबून आहे. तसेच परतीच्या पावसाने हे धरण शंभर टक्के भरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Sep 30, 2020, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details