लातूर - चार वर्षे शिक्षिका म्हणून सेवा करूनही पगार मिळत नसल्याने एका दिव्यांग शिक्षिकेवर आणि त्यांच्या पतीवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. कडाक्याच्या थंडीत हे दाम्पत्य दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. आपल्या हक्काचा पगार देण्यासाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्याचा आरोप ज्योती अक्कलवार यांनी केला आहे.
दिव्यांग शिक्षिकेचा न्यायासाठी लढा; दोन दिवसांपासून आमरण उपोषण - सुगत शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर न्यूृज
ज्योती अक्कलवार या देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंध विद्यालयात अंधविशेष शिक्षिका म्हणून 10 फेब्रुवारी 2014 ला रुजू झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन समाजकल्याण अधिकारी वैसाका गोडगोडवर यांनी ज्योती अक्कलवार या 19 एप्रिल 2018 पासून रुजू असल्याचे नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय मान्यता असतानाही 2014 पासूनचे वेतन त्यांना मिळाले नाही.
![दिव्यांग शिक्षिकेचा न्यायासाठी लढा; दोन दिवसांपासून आमरण उपोषण ज्योती अक्कलवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5813263-thumbnail-3x2-blind.jpg)
ज्योती अक्कलवार या देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंध विद्यालयात अंधविशेष शिक्षिका म्हणून 10 फेब्रुवारी 2014 ला रुजू झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन समाजकल्याण अधिकारी वैसाका गोडगोडवर यांनी ज्योती अक्कलवार या 19 एप्रिल 2018 पासून रुजू असल्याचे नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय मान्यता असतानाही 2014 पासूनचे वेतन त्यांना मिळाले नाही. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त हे लातुरात असल्याने या दाम्पत्याने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा - मनसे सर्व धर्मांना एकत्रित घेत वाटचाल करेल'
चुकीची प्रशासकीय मान्यता देऊन फसवणूक झाल्याचा आरोप ज्योती अक्कलवार यांनी केला आहे. आत्तापर्यंत अनेकवेळा आंदोलन, उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.