लातूर -एक लोकप्रतिनिधी म्हणून कोरोनाबाबत जनजागृती करणे हे सरपंचाचे काम असते. मात्र, सरपंचाकडूनच नियम पायदळी तुडवल्यावर काय होते, याचा प्रत्यय चाकूर तालुक्यात आला आहे. सरपंचानी आपल्या पुतणीच्या विवाह समारंभात 50 हून अधिक व्यक्तींना आमंत्रित केल्याने, त्यांना दहा हजारांचा दंड भरावा लागला आहे. शंकर मोरगे असे या सरपंचाचे नाव आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन, सरपंचाला 10 हजारांचा दंड नियमांचे उल्लंघन केल्याने दंड
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून नव-नवे नियम लादले जात आहेत. सध्या दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. असे असताना चाकूर तालुक्यातील मांडुरकी येथील सरपंच शंकर मोरगे यांनी नियमांचे उल्लंघन करत, आपल्या पुतणीच्या लग्णात 50 हुन अधिक व्यक्तींना आमंत्रित केले. त्यामुळे या विवाह समारंभात नियमांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, तलाठी एम. के. पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत सरपंचाना 10 हजारांचा दंड ठोठावला. सरपंच शंकर मोरगे यांनी त्यांच्या पुतणीच्या विवाह प्रसंगी नियमांची अंमलबजावणी केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक रमाकांत तोगरगे यांनी दिली.
हेही वाचा -शेजारील राज्यातूनही रुग्ण येत असल्याने नागपुरात बेड मिळण्यास अडचणी