लातुर - कोरोनाच्या संकटात नात्यागोत्याचा विचार न करता परक्यांसाठीही मदतीचे हात पुढे येत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यात्रा उरूसमध्ये आकाशपाळणे चालवण्यासाठी गावच नाही तर राज्य सोडून काही कुटुंब लातुरमध्ये दाखल झालीत. प्रतिकूल परस्थितीमध्ये मालकाकडून मदत होईल, अशी आशा या मजूरांना होती. मात्र, ऐन वेळी त्याने टाळाटाळ केली आणि लामजनाकरांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. गावकऱ्यांच्या या पुढकारामुळे त्यांना दोन वेळचे जेवण मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्या भरवश्यावर त्यांनी गाव सोडले त्यांनी मात्र आधार देणेच सोडले आहे.
कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीत नोकरांना कामावरून कमी करू नका, त्यांचा उदनिर्वाह होईल याची व्यवस्था करा, अशा सुचना केल्या जात आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील या मजूर कुटूंबीयाकडे त्यांच्या मालकाने दुर्लक्ष केले आहे. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील गावागावातील यात्रा, उरुसांमध्ये आकाशपाळणे उभारून मजुरांना पैसे मिळत होते. परंतू सध्याच्या संचारबंदीत सर्व यात्रा उत्सव तर बंद आहेत. गुडुकुमार गौतम यांच्यासारख्या 5 कुटूंबियांचा परतीचा मार्गही धरणे अवघड झाले आहे.