लातूर- रेणापूर तालुक्यातील चुकारवाडी-पाथरवाडी या दीड किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलेले आहे. पावसाळ्यात तर या मार्गावरून पायी चालणेही अवघड होते. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही लोकप्रतिनीधींचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी सोमवारी लातूर-अहमदपूर या राज्यमार्गावरील पाथरवाडी येथे वाहने आणि बैलगाड्या घेऊन रास्तारोको केला.
चुकारवाडी ग्रामस्थांचा रस्त्यावर बैलगाडी उतरवून 'रास्तारोको' - road
रेणापूर तालुक्यातील चुकारवाडी-पाथरवाडी या दीड किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या 5 वर्षांपासून रखडले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी रास्तारोको केला.
चुकारवाडी ते पाथरवाडी या रस्त्याचे काम झाल्यास हे गाव दळवळणाच्या प्रवाहात येणार आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आमदार त्रिंबक भिसे यांनीही दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी लोकप्रनिधीसह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात तर चुकारवाडी ग्रामस्थांचा संपर्कच तुटतो. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. ग्रामसडक योजनेचे अभियंता गुरमे यांनी नोव्हेंबर महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.