लातूर - महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अडीच वर्षानंतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर असणार आहेत.
लातूर महानगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर - latur mayor
लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अडीच वर्षांनंतर पुन्हा सत्ता काँग्रेसच्या ताब्यात गेली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे नवे महापौर असणार आहेत.
![लातूर महानगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5142523-thumbnail-3x2-mayor1.jpg)
लातूर मनपा
लातूर महानगरपालिका
काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांनी भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करत लातूर महापालिकेचे महापौरपद काबीज केले. ते लातूरचे नवे महापौर असणार आहेत. भाजपचे 35 नगरसेवक, काँग्रेसचे 32 नगरसेवक आणि 1 वंचित बहुजन आघाडीचा एक नगरसेवक असताना काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यातील 68 मतांपैकी 35 मते काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना मिळाली.
हेही वाचा -परभणीत पुन्हा काँग्रेसचा महापौर? आज होणार निवड, राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर!
Last Updated : Nov 22, 2019, 3:10 PM IST