लातूर -अहमदपूर तालुक्यातील साताळा येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायन खरोळकर यांचा सांगलीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पूरस्थिती ओसरल्यानंतर राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरग्रस्त भागात पाचारण करण्यात आले हाते. यामध्ये डॉ. खरोळकर यांचादेखील समावेश होता.
पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या लातुरातील डॉक्टरचा मिरजेत मृत्यू - डॉ. नारायन खरोळकर
अहमदपूर तालुक्यातील साताळा येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायन खरोळकर यांचा सांगलीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परीसरात पूरस्थिती ओसरल्यानंतर राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरग्रस्त भागात पाचारण करण्यात आले हाते. यामध्ये डॉ. खरोळकर यांचादेखील समावेश होता.
पुरग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या लातुरातील डॉक्टरचा सांगलीत मृत्यू
१४ अॉगस्ट रोजी डॉ. खरोळकर हे मिरज येथे दाखल झाले होते. त्यांनी नांद्रे आणि कर्नाळ गावातील जनावरांवर उपचार केले. त्यांनतर ते जिल्हा परिषदेच्या शेतकरी निवास येथे मुक्कामी होते. रविवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. लातूर येथील मारवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.