निलंगा (लातूर) -शहरासह अनेक गावात आज (शनिवारी) दीड वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाला. यावेळी व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर इतका होता, की अनेक झाडे, विजेचे खांब मोडले गेले. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले. या सर्व प्रकारामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
सकाळपासून उन्हाची तीव्रता असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच वादळाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह निलंगा शहरासह तालुक्यातील झरी, लांबोटा, सिंदखेड, निटूर, अंबुलगा बु. केळगाव, कलांडी यासह आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.